-
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने, काही वर्षांपूर्वी ती अशा परिस्थितींवर खूप लवकर प्रतिक्रिया द्यायची. पण, आता ती ‘रिअॅक्ट‘ न करता ‘रिस्पॉण्ड‘ करणं शिकत आहे. या बदलामुळे तिच्या आयुष्याची गुणवत्ता वाढली, असे सांगितले.
-
एका स्पोर्टस् ब्रँडच्या प्रमोशनल कार्यक्रमात अनुष्काने, “मी आधी पटकन रिअॅक्ट करायचे; पण आता विचारपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझं आणि विराटचंही जीवन बदललं आहे,” असे सांगितले.
-
अनुष्काने मजेशीरपणे विराटच्या मैदानावरील प्रतिक्रियांबद्दल बोलताना, “कधी कधी गोलंदाजांपेक्षा जास्त सेलिब्रेशन विराट करतो,” असे सांगितले.
-
मानसशास्त्रज्ञ डॉ. अदमिना गुप्ता यांच्या मते, प्रत्येक जण पटकन रिअॅक्ट करतोच, असं नाही; पण काही जीवनातील ताणतणाव अशा ‘घाईच्या प्रतिक्रिया’ घडवू शकतात. त्या क्षणी आपण विचार न करता, कृती करतो.
-
आपल्या मेंदूमध्ये सतत चालणारा ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ मोड म्हणजेच ताणावरील प्रतिक्रिया., पूर्वी जगण्यासाठी ती)आवश्यक होती.
-
या प्रतिक्रियेद्वारे अनेकदा आपण अविचारी वर्तन करतो, ज्यामुळे नंतर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येते, असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. सामाजिक आर्थिक ताण, जनुकीय घटक व बिघडलेले मानसिक आरोग्य या बाबी अशा विघातक प्रवृत्तीला खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरू शकतात.
-
डॉ. गुप्ता सांगतात की, भावनांवर नियंत्रण ठेवणे (emotional regulation) शिकल्याने आपण मेंदूला पुन्हा ‘रीवायर’ करू शकतो. खोल श्वास घेऊन काही क्षण थांबणे किंवा संवाद पुढे ढकलणे यांमुळे विचारपूर्वक प्रतिसाद देणे शक्य होते.
-
त्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले सजगता आणि ध्यान यांचा रोजच्या दिनचर्येत समावेश करणे, दैनंदिन स्वयंनोंदींद्वारे आपल्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करणे, विचारांची पुनर्रचना करणे आणि प्रतिसाद देण्याआधी थोडा विराम घेणे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का शर्मा/इन्स्टाग्राम)

Navi Mumbai International Airport Inauguration Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले, थोड्याच वेळात संबोधित करणार