-    बॉलिवूड अभिनेत्री व रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी जिनिलीया देशमुखने (Genelia Deshmukh) सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 
-    जिनिलीयाची सासू आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पत्नी वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांचा आज वाढदिवस आहे. 
-    जिनिलीयाने सासूबाईंबरोबरचा फॅमिली फोटो शेअर करत ‘आम्हा सगळ्यांच्या लाडक्या….आजीमा, आई!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या!! We Love You !!’ असे कॅप्शन दिले आहे. 
-    जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
-    जिनिलीयाचे सासूबाई वैशाली देशमुख यांच्याबरोबर सुंदर असे बॉण्डिंग आहे. 
-    जिनिलीयाने हिंदीबरोबर दाक्षिणात्य व मराठी चित्रपटसृष्टीतही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 
-    जिनिलीया व रितेशकडे चित्रपटसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून पाहिले जाते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम) 
 
  प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली… 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  