-
केबीसी ज्युनिअरची सध्या चांगलीच चर्चा होते आहे. अमिताभ बच्चन हे केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘होस्ट’ करत आहेत. त्यांना इशित भट्ट या मुलाने उलट उत्तरं दिली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया)
-
केबीसी ज्युनिअरच्या विशेष एपिसोडमध्ये इशित भट्ट हा पाचवीतला मुलगा अमिताभ बच्चन यांना उलट उत्तरं देत होता. तो प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शनही ऐकून न घेता उत्तर देत होता.
-
सर, मला नियम सांगत बसू नका, थेट प्रश्न विचारा असं म्हणतच त्याने केबीसी ज्युनिअरच्या या खेळाला सुरुवात केली. त्याने व्यवस्थित आणि अतिआत्मविश्वास न दाखवता उत्तरं दिली असती तर तो जिंकू शकला असता. पण पाचव्या प्रश्नावरच त्याचा अतिआत्मविश्वास त्याला नडला.
-
मुलगा उद्धटपणा करत असूनही त्याचे आई वडील स्मित हास्य करत हा शो बघत होते.
-
सकाळी जे भोजन सेवन केलं जातं त्याला काय म्हणतात? असं विचारलं असता पर्यायही न ऐकता या मुलाने ब्रेकफास्ट असं उत्तर दिलं.
तसंच टँगो, कथ्थक, ब्रेक हे कसले प्रकार आहेत विचारलं असता पर्यय न ऐकता त्याने नाच मला जो अजिबात आवडत नाही असं म्हणत पुन्हा उध्दटपणा केला. -
मला लोकांसाठी पर्याय सांगावेच लागतील असं अमिताभ बच्चन इशित भट्टला म्हणाले. तरीही तो गप्प बसला नाही. बुद्धिबळात किती राजे असतात असा प्रश्न होता त्यावर त्याने हा काय प्रश्न आहे का? याचं उत्तर दोन आहे. असं म्हणत पुन्हा उद्धट पणा केला.
-
पाचवा प्रश्न रामायणाशी संबंधित होता. वाल्मिक रामायणाच्या पहिलं कांड कुठलं आहे? हे विचारताच इशित भट्ट ऑप्शन्स असं म्हणाला. ज्यावर सगळे हसले. मग ऑप्शन तो डालो म्हणत पुन्हा अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर दिलं. बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड, किष्किंधा कांड असे पर्याय दिले. ज्यावर इशितने अयोध्याकांड असं उत्तर दिलं आणि तो हरला. कारण योग्य उत्तर बालकांड असं होतं.
-
पाचव्या प्रश्नाचं उत्तर चुकल्यानंतर इशितचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तसंच त्याच्या आई वडिलांचाही चेहरा उतरला. मात्र त्याच्या उद्धटपणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…