-
शोले चित्रपटात जेलरची भूमिका साकरणारे असरानी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या निमित्ताने शोलेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या चित्रपटातील ठाकूर पासून सांबा, कालिया पर्यंत अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
-
शोले चित्रपटातील जेलर साकारणारे असरानी यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या सिनेमाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
-
शोले चित्रपटात ठाकूर बलदेव सिंग ही भूमिका साकारणारे संजीव कुमार आता या जगात नाहीत. त्यांचा मृत्यू ६ नोव्हेंबर १९८५ ला झाला.
-
शोले चित्रपटात गब्बर सिंग ही भूमिका साकारणाणारे आणि जगणारे अभिनेते म्हणजे अमजद खान. १९९२ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
-
शोले चित्रपटात सूरमा भोपाली हे पात्र साकारणाऱ्या जगदीप यांनीही २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला.
-
शोले चित्रपटात कालियाची भूमिका करणाऱ्या विजू खोटे यांनीही २०१९ मध्ये जगाचा निरोप घेतला.
-
शोले चित्रपटातील सांबा हे पात्र साकारणारे मॅक मोहन हेदेखील २०१० मध्ये काळाच्या पडद्याआड गेले.
-
शोले चित्रपटात हरिराम नाई हे पात्र साकारणारे केश्तो मुखर्जी यांनीही १९८२ मध्ये जगाचा निरोप घेतला. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
-
शोले चित्रपटात मौसीचं पात्र साकारणाऱ्या लीला मिश्रा यांचंही १९८८ मध्ये निधन झालं.
-
शोले चित्रपटात इमाम चाचा हे पात्र साकारणाऱ्या ए. के. हंगल यांनीही जगाचा निरोप २०१२ मध्ये घेतला.
-
रामलाल हे पात्र शोले चित्रपटात साकणाऱ्या सत्येन कपूर यांनीही २००७ मध्ये जगाचा निरोप घेतला.

‘सर्व हिंदूंना अमेरिकेतून बाहेर काढा’, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यामुळे FBI चे प्रमुख, भारतीय वंशाचे काश पटेल ट्रोल