-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘बास्टियन’ रेस्टॉरंटचे अनेक फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
यंदा मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी दिवाळी साजरी करण्यासाठी शिल्पाच्या आलिशान रेस्टॉरंटला गेल्याचं पाहायला मिळालं.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता पृथ्वीक प्रतापने सुद्धा नुकतीच शिल्पाच्या ‘बास्टियन’ रेस्टॉरंट भेट दिली.
-
दिवाळीनिमित्त पृथ्वीक आपल्या पत्नीसह ‘बास्टियन’ रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता.
-
‘बास्टियन’मधील सुंदर फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या पत्नीने सुंदर साडी नेसल्याचं पाहायला मिळतंय.
-
यातील एका फोटोमध्ये ‘बास्टियन’मधील प्रसिद्ध स्वीट डिशची झलक पाहायला मिळतेय.
-
‘Pull Me Up’ हे बास्टियनला जाणाऱ्या खवय्यांचं आवडतं Dessert आहे. अभिनेत्याला सुंदर असं प्लेटिंग करून ही स्वीट डिश सर्व्ह करण्यात आली होती.
-
अभिनेत्याने या फोटोंना “दिवाळी अपग्रेडेड… माझ्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा..!” असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, पृथ्वीक प्रताप आता लवकरच ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीक प्रताप आणि शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट )

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका