-
मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत
-
अजिंक्य राऊत सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. अशातच त्याची एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
या पोस्टमधून अजिंक्यनं त्याच्या तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाचा खास अनुभव शेअर केला आहे.
-
अभिनेत्याने नुकतंच तुळजापूरच्या देवी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि हे दर्शन त्यानं सामान्य भाविक म्हणून घेतलं.
-
याबद्दल अजिंक्य म्हणतो, “प्रत्येक वेळी चित्रपट किंवा प्रोजेक्ट रिलीज होताना टीमसह VIP दर्शन घेत घेत कंटाळा आला होता.”
-
“यावेळी प्रत्येकजण रांगेत उभं राहून जसं तुळजापुरच्या भवानी मातेचं दर्शन घेतो, तसंच दर्शन घ्यायची माझीसुद्धा इच्छा होती.”
-
यापुढे अजिंक्यने सांगितलं, “५ तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाभला; त्या आदीमायेचा आशीर्वाद मिळाला आणि मनापासून धन्य झालो.”
-
“देव नेहमी मंदिरात नसतो. तो त्या भक्तांच्या मनात असतो, जे तासनतास श्रद्धेने आईच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहतात.”
-
अजिंक्यने या दर्शनाचे खास फोटो शेअर केले आहेत. तसंच अजिंक्यच्या या साधेपणाचं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, अजिंक्यचा ‘अभंग तुकाराम’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. यात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
बी. आर. गवई यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?