-
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री गौरी नलावडे हिचे नवे फोटोशूट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
-
गौरीने या फोटोशूटसाठी खास पिवळ्या रंगाची साडी निवडली आहे. साडीचा पोत अतिशय मऊ आणि चमकदार असून, त्यावर नक्षीदार कलाकुसर केल्याचे दिसत आहे. पारंपरिक साडीला ऑफ-शोल्डर ब्लाऊजसोबत परिधान करून तिने हटके आणि मॉडर्न टच दिला आहे.
-
साडीवरील तिचा लूक अधिक खास बनवला आहे ते तिने परिधान केलेल्या दागिन्यांनी. गळ्यात तिने पारंपरिक, पण आकर्षक असा ‘चोकर’ नेकलेस घातला आहे, ज्यात हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या खड्यांची नक्षी आहे.
-
गळ्यातील दागिन्यांशी जुळणारी मोठी आणि कलाकुसर केलेली कर्णफुले तिने परिधान केली आहेत. एका हातात असलेली सोन्याची नाजूक बांगडी तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे.
-
या फोटोत गौरी एका दरवाजाच्या चौकटीत उभी राहून पोज देताना दिसत आहे. ती दरवाजाच्या हँडलला धरून कॅमेऱ्याच्या दिशेने पाहतेय. तिची ती नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे.
-
गौरीने या लूकमध्ये सटल (Suttle) आणि एलिगंट (Elegant) मेकअप ठेवला आहे. तिच्या डोळ्यांतील दिलखेचक नजर लक्ष वेधून घेणारी आहे.
-
तसेच, वेवी (Wavy) हेअरस्टाईलमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक स्टायलिश दिसत आहे.
-
‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेपासून ते ‘गोदावरी’ या चित्रपटापर्यंत गौरीने तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक