-
गेल्या काही दिवसांपासून “मन धावतया तुझ्याच मागं, डोलतया तुझ्याचसाठी…” हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
हे गाणं आयपॉपस्टार या शोमध्ये मराठमोळ्या राधिका भिडेने गायलं आहे.
-
राधिका भिडे ही मूळची रत्नागिरीची असून गेल्या दोन वर्षांपासून ती मुंबईत राहते.
-
राधिका संगीत दिग्दर्शक, निर्माती, गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. लहान वयातच तिने संगीत क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे.
-
राधिकाने “मन धावतया तुझ्याच मागं…” हे तिचं गाणं सादर करताच परीक्षकांचे डोळे सुद्धा पाणावले होते. राधिकाच्या सुमधूर आवाजाने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं.
-
तुम्हाला माहितीये का? राधिका ही शमिका भिडेची धाकटी बहीण आहे.
-
शमिका भिडे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे नावारुपाला आली होती. राधिका-शमिकाने अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र परफॉर्म सुद्धा केलं आहे.
-
शमिकाने सुद्धा लाडक्या बहिणीचं कौतुक करत खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
-
दरम्यान, आयपॉपस्टार हा शो MX प्लेयरवर प्रसारित केला जातो. सध्या मराठी कलाकार सुद्धा राधिकाचं भरभरून कौतुक करत आहेत. या शोची संकल्पना अन्य शोजपेक्षा बरीच वेगळी आहे. यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्वत: लिहिलेली आणि कंपोझ केलेली गाणी सादर करावी लागतात. ( सर्व फोटो सौजन्य : राधिका भिडे व शमिका भिडे इन्स्टाग्राम )
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…