-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर प्रसिद्धीझोतात आली.
-
प्रियदर्शिनीने (Priyadarshini Indalkar) नुकताच आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस साजरा केला.
-
प्रियदर्शिनीच्या बहिणीचे नाव मधुमती इंदलकर (Madhumati Indalkar) असे आहे.
-
मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलतबहीण आहे आणि तिला डाऊन सिंड्रोम असून, ती स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे.
-
स्पेशल ऑलिम्पिकमध्ये बोची (Bocce) या खेळात मधुमतीला रौप्यपदक मिळाले आहे.
-
प्रियदर्शिनीने मधुमतीच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट केक आणला होता.
-
‘Happy Birthday My Star’ असे कॅप्शन देत प्रियदर्शिनीने मधुमतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वी प्रियदर्शिनीचा ‘दशावतार’ (Dashavatar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू विनयभंग प्रकरणी भाजपाच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांनी बाहेर पडण्यापूर्वी…”