-
लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकताच बोरिवलीच्या ग्राहक संघाच्या प्रदर्शनातील साडीखरेदीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. साडीच्या सौंदर्यापेक्षा विक्रेत्याच्या वागण्यामुळे ही खरेदी संस्मरणीय ठरली.
-
हेमांगी कवी एका प्रदर्शनात साड्या पाहत असताना तिला एक सुंदर साडी दिसली. तिच्या डोळ्यांना आणि मेंदूला ती साडी कलमकारी (Kalamkari) प्रिंटची असल्याचे जाणवले.
-
अभिनेत्रीने साडीच्या प्रिंटबद्दल विक्रेतीला विचारले, तेव्हा त्या महिलेने अतिशय त्रासिक मुद्रेने ‘पेन कलमकारी’ (Pen Kalamkari), असे उत्तर दिले.
-
साडी अधिक व्यवस्थित पाहण्यासाठी हेमांगीने ती उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विक्रेतीने खेकसून ‘जादा खोलो मत साडी’ असे कठोरपणे सुनावले.
-
विक्रेत्याच्या या उद्धट वागण्यामुळे हेमांगीचा राग अनावर झाला; पण तिने स्वतःला शांत ठेवले.
-
रागावर नियंत्रण ठेवून तिने शांतपणे त्या साडीची किंमत विचारली.
-
विक्रेतीने साडीची किंमत ‘१२०० रुपये’ सांगताच, हेमांगीने कोणताही विचार न करता लगेच ‘पॅक कर दो’, असे सांगितले.
-
हेमांगीच्या या त्वरित खरेदीच्या निर्णयामुळे ती ‘खडूस’ विक्रेती क्षणभर स्तब्ध झाली आणि तिने पटकन साडी पॅक करून दिली.
-
विक्रेत्या महिलेने ‘पेन कलमकारी’ सांगितले असले तरी किंमत ऐकल्यावर हेमांगीची खात्री झाली की, ती साडी खरी हँड पेंटेड कलमकारी नसून, ब्लॉक प्रिंटेड आहे.
-
साडी शुद्ध कॉटनची होती आणि तिचा रंगसंगती व डिझाईन खूप छान होती. त्यामुळेच हेमांगीने ती साडी तिच्या कलेक्शनसाठी ‘कलमकारीसारखी दिसणारी’ साडी म्हणून खरेदी केली.
-
साडीखरेदीचे अनुभव नेहमीच छान नसतात. कधी कधी असेही अनुभव येतात, असे म्हणत हेमांगीने या प्रसंगाला पूर्णविराम दिला. (सर्व फोटो सौजन्य : हेमांगी कवी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती