-
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेता निमिश कुलकर्णी.
-
‘शिवाली हे खरंय’ यासारख्या अनेक लोकप्रिय स्किट्समधून निमिशनं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्याची अनोखी विनोदी शैली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
-
आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांना हसवणारा निमिश सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतो.
-
नुकताच (२६ ऑक्टोबर) निमिशचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच त्याला एका खास व्यक्तीनं खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
ही खास व्यक्ती म्हणजे, निमिशची होणारी पत्नी कोमल भास्कर. कोमलनं होणाऱ्या नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. दोघांचे एकत्र फोटो शेअर करीत कोमलनं त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तू माझ्या आयुष्यात जो आनंद आणला आहेस, त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. असाच नेहमी माझ्याबरोबर राहा” असं म्हणत कोमलनं निमिशला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
कोमलनं शेअर केलेल्या या पोस्टला निमिशनंही रोमँटिक अंदाजात उत्तर दिलं आहे. या पोस्टखालील कमेंटमध्ये निमिशनं कोमलला “I Love You Future Wife” असं म्हटलं आहे.
-
२५ जुलैला निमिश आणि कोमल यांचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर खास फोटो शेअर करीत निमिशनं या साखरपुड्याची खुशखबर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेला निमिश झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोच्या दिग्दर्शन टीममध्ये तो आहे. (सर्व फोटो सौजन्य : निमिश कुलकर्णी इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती