-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली लोकप्रिय मालिका म्हणजे ‘लपंडाव’. या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेता चेतन वडनेरे मुख्य भूमिकांत आहेत.
-
‘लपंडाव’ या मालिकेचं कथानक एका रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत सखी आणि कान्हा यांच्या लग्नाची धामधूम सुरू झालीय.
-
सखी आणि कान्हा यांच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच दोघांच्या हटके प्री-वेडिंगचे फोटो समोर आले आहेत. स्टार प्रवाहनं आपल्या सोशल मीडियाद्वारे हे खास फोटो शेअर केले आहेत.
-
पारंपरिक आणि मराठमोळ्या अंदाजात सखी आणि कान्हा यांनी लग्नाचं प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे. सखीनं लाल रंगाची नाऊवारी परिधान केली आहे, तर कान्हानं धोतर, कुर्ता आणि त्यावर डिझाइनर जॅकेट परिधान केला आहे.
-
सखीनं या लाल नऊवारी साडीवर केसांत गजरा, गळ्यात पारंपरिक दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या असा मराठमोळा लूक केला आहे. तर कान्हाही त्याच्या लूकमध्ये सुंदर दिसत आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड असलेला असा दोघांचा लूक आहे.
-
सखी आणि कान्हा या दोघांच्या नावानुसार ‘सन्हा’ असा विशेष हॅशटॅगही बनवला आहे. मराठी मालिकांमध्ये प्री-वेडिंग शूट ही एक अनोखी संकल्पना ठरली आहे. कारण मालिकेच्या कथानकात प्री-वेडिंग शूट पहिल्यांदाच करण्यात आलं आहे.
-
सखी आणि कान्हाचं हे हटके प्री-वेडिंग फोटोशूट चाहत्यांच्याही विशेष पसंतीस उतरलं आहे. दोघांच्या या प्री-वेडिंगच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ही मालिका दुपारी २ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते. यात कृतिका देव, चेतन वडनेरे आणि रुपाली भोसले या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक