-
मंडळी हा देखावा आहे मुंबईतील वडाळा येथे राहणाऱ्या आदित्य चव्हाण व श्रुतिका चव्हाण यांच्या घरातील.
-
थाटामाटात गणेशोत्सव साजरा होत असताना मुंबईकराने घरातच साकारलेल्या या देखाव्यानेही सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या देखाव्यात प्राचीन काळातील एक मंदिर बनवण्यात आले आहे.
-
हे एक मंदिर हिंदू मंदिर आहे.
-
मंदिरामध्ये आपल्याला सूर्यदेव, अग्निदेव, लक्ष्मी, विष्णु, गणपती, सरस्वती, कृष्ण पाहायला मिळतात.
-
या कलाकृतीमधून आम्ही भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे आदित्य चव्हाण सांगतात. त्यांनीच ही संपूर्ण सजावट केली आहे.
-
या कलाकृतीमध्ये हजारो वर्ष जुनी भित्तीचित्रे बघायला मिळत आहेत, जे हिंदू धर्माचे व्यापक स्वरूप राहिले आहेत.
-
या देखाव्यातील मंदिरावर केलेलं कोरीव काम, बारीक शिल्पकला आणि भित्तीचित्रे हे विशेष आकर्षण ठरत आहे.
-
शतकांपूर्वीच्या या कलाकृतीत हिंदू धर्माचे तसेच देव-देवतांची महती आणि त्यांचे विविध अवतार यांचे दर्शन घडतेय.
-
हा देखावा पाहिलेल्या प्रत्येकाला अध्यात्मिक शांतीसोबतच भारतीय परंपरेचीही ओळख होते आहे.
-
हे मंदिर सांस्कृतिक वारसा जतन करणाच्या उद्देशाने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल.
-
या देखाव्यासाठी ८० दिवसांचा कालावधी लागला आहे.
-
कोणत्या वस्तू वापरुन बनवला देखावा?
५०%लायवूड, २०%लगदा माती,१५% थर्मोकोल, ५% पेपर, १०% पी ओ पी -
देखाव्यात विराजमान गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती, ही मूर्ती मूर्तीकार अभिषेक सुनंका यांनी बनवली आहे.
-
ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांना २० दिवसांचा वेळ लागला.
-
दरम्यान, यंदाचं तिसरं वर्ष असल्याचंही आदित्य चव्हाण यांनी सांगितलं.
-
या सुंदर देखाव्याला आतापर्यंत ३०० लोकांनी भेट दिली आहे.
-
प्रतिक्रिया काय असतात?
“आम्ही भारतीय संस्कृतीचा जो काळ लोकांसमोर मांडत आहे- वैष्णव आणि शैव या दोन्ही पंथांचा संगम म्हणजेच शिव आणि विष्णूचा संगम. हे लोकांना मनमोहक वाटत आहे. तसेच आपली संस्कृती आणि आपला इतिहास बघून लोक थक्क होत आहेत.”, अशी माहिती त्यांनी दिली. (सर्व फोटो- इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: “तू अजून हवी होतीस…” म्हणत प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीत खांडकेकरने शेअर केले तिच्याबरोबरचे हसरे क्षण

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी