-
भारतीय बाजारात 'हॅचबॅक' कारची डिमांड सर्वाधिक असते. कमी किंमत, लो मेंटेनन्स आणि उत्तम माइलेजमुळे या कार लवकर पसंतीस उतरतात.
-
गेल्या महिन्यातच जपानच्या Datsun कंपनीने भारतीय बाजारात आपली redi-GO नवीन अपडेटेड इंजिनसह लाँच केली. यासोबतच सध्या देशाच्या ऑटो मार्केटमध्ये असलेल्या कारपैकी 'Datsun Redi-GO फेसलिफ्ट' ही सर्वात स्वस्त छोटी फॅमिली कार ठरली आहे.
-
छोट्या फॅमिलीसाठी कमी किंमतीतील ही कार सध्या भारतीय बाजारातील सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.
-
या कारमध्ये कंपनीने परवडणाऱ्या किंमतीत शानदार आणि आवश्यक सर्व फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
शानदार फीचर्ससह नवीन 'Datsun Redi-GO' चा माइलेजही उत्तम आहे.
-
आधीप्रमाणेच दोन इंजिन प्रकारात ही गाडी आली आहे.
-
कमी किंमतीमुळे मार्केटमध्ये या कारची थेट टक्कर मारुती ऑल्टो, रेनॉ क्विड आणि मारुति एस-प्रेसो यांसारख्या कारशी आहे.
-
कंपनीने ही कार चार व्हेरिअंटमध्ये (D, A, T, T(O))बाजारात उतरवली आहे.
-
जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या कारच्या लूकमध्ये अनेक बदल झालेत. अपडेटेड redi-GO आधीपेक्षा जास्त बोल्ड आणि स्टाइलिश दिसतेय.
-
यामध्ये नवीन क्रोम-फिनिश ग्रिल, L-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी फॉग लॅम्प दिले आहेत. स्मोक्ड हेडलाइट्स आणि मागे नवीन एलईडी टेललाइट्स व रूफ स्पॉइलर देण्यात आले आहेत. फ्रंट आणि रिअर बंपरच्या डिजाइनमध्येही बदल झाला आहे.
-
नवीन redi-GO च्या पुढील बाजूला नवीन L-शेप LED डे टाइम रनिंग लाइट्ससह रुंद आणि मोठे फ्रंट ग्रिल दिले आहेत. त्यामुळे कारचं फ्रंट लूक अधिक आकर्षक झालं आहे.
-
तर, कारच्या मागील बाजूला LED टेल लाइट्स आणि फॉक्स स्कीड प्लेट्स आहेत. त्यामुळे गाडीला स्पोर्टी लूक मिळालंय.
-
या कारमध्ये कंपनीने परवडणाऱ्या किंमतीत शानदार आणि आवश्यक सर्व फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्टसह 8.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ब्लूटूथ, व्हिडिओ प्ले-बॅक , व्हॉइस रिकग्निशनचा समावेश आहे.
-
याशिवाय, रिअर पार्किंग कॅमरा, डिजिटल टेकोमीटर, ड्राइव्हर एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD)आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) व स्पीड अलर्ट सिस्टिम यांसारखे फीचर्स दिले आहेत.
-
नवीन redi-GO च्या पुढील बाजूला नवे L-शेप LED डे टाइम रनिंग लाइट्ससह रुंद आणि मोठे फ्रंट ग्रिल दिले आहेत. त्यामुळे कारचं फ्रंट लूक अधिक आकर्षक झालं आहे.
-
सुरक्षेसाठी या नवीन redi-GO कारमध्ये एबीएस, ईबीडी, ड्राइव्हर साइड एअरबॅग, रिअर डुअर चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्राइव्हर-पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हर स्पीड वॉर्निंग, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि रिअर पार्किंग सेंसर्स हे फीचर्स आहेत.
-
तर, गाडीच्या टॉप मॉडेलमध्ये पॅसेंजर साइड एअरबॅग आणि प्रोजेक्शन गाइडसबोत रिव्हर्स पार्किंग कॅमेराही आहे.
-
ड्युअल-टोन कव्हर्ससह 14-इंचाचे व्हिल्स या गाडीला देण्यात आले आहेत.
-
कंपनीने नवीन कारच्या इंटीरिअरमध्येही बदल केला आहे. कारच्या कॅबिनला आधीपेक्षा जास्त प्रीमियम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन रेडी-गोचं इंटीरिअर ब्लॅक कलरमध्ये आहे.
-
ही कार कंपनीने आधीप्रमाणेच दोन इंजिन प्रकारात आणली आहे. यात 0.8-लिटर आणि 1.0-लिटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. दोन्ही बीएस-6 इंजिन आहेत.
-
0.8-लिटर इंजिन 5,600 rpm वर 54 bhp पॉवर आणि 4,250 rpm वर 72 Nm टॉर्क निर्माण करतं. तर, 1.0-लिटर इंजिन 5,550 rpm वर 67 bhp पॉवर आणि 4,250 rpm वर 91 Nm टॉर्क निर्माण करतं. 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे दोन्ही इंजिन येतात. 1.0-लिटर इंजिनसह 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.
-
नवीन दॅटसन रेडी-गोच्या 0.8-लिटर इंजिनचा माइलेज 20.71 किलोमीटर प्रतिलीटर आहे.
-
तर, 1.0-लिटर इंजिनचा माइलेज मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत 21.7 किलोमीटर आणि एएमटी गिअरबॉक्ससह 22 किलोमीटर प्रतिलीटर इतका आहे.
-
या 5-सीटर कारची एक्स-शोरुम किंमत या सेगमेंटमधील मारुती ऑल्टो, रेनॉ क्विड आणि मारुति एस-प्रेसोच्या किंमतीपेक्षा कमी आहे.
-
'दॅटसन रेडी-गो'च्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 2.83 लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची किंमत 4.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. 0.8-लिटर इंजिनच्या चार व्हेरिअंटची (D, A, T, T(O))अनुक्रमे किंमत (एक्स-शोरुम) 2.83 लाख, 3.58 लाख, 3.80 लाख आणि 4.16 लाख रुपये आहे. तर, 1.0-लिटर इंजिन कारमध्ये केवळ T(O) हे एकच व्हेरिअंट आहे. 1.0-लिटर इंजिन- मॅन्युअल मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 4.44 लाख आणि एएमटी मॉडेलची किंमत 4.77 लाख रुपये आहे. (सर्व फोटो सौजन्य-Datsun)

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल