-
राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाने कोविड १९ ची स्वचाचणी करण्याची सोय राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेच दिली आहे. @MahaDGIPR या ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. चला तर मग पाहूयात घर बसल्या कशाप्रकारे करता येईल करोनाची स्वचाचणी….
-
@MahaDGIPR ने ट्विट केलेल्या फोटोमध्ये करोना स्वचाचणी करण्यासाठी एक अधिकृत वेबसाईटबरोबरच हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. covid-19.maharashtra.gov.in या वेबसाईटवर किंवा ९५१३६१५५५०१ या क्रमांकाच्या मदतीने करोना स्वचाचणी करता येईल.
-
़covid-19.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर असं होमपेज दिसेल. या पेजवर तुम्हाला हवी ती भाषा निवडता येईल. भाषा निवडल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाल.
-
येथे वय, लिंग आणि पीन कोड यासारखी माहिती द्यावी लागेल.
-
पुढच्या पेजवर शरीराचे तापमान, लक्षणं यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल.
-
त्यानंतर पुढील पेजवर प्रवास किंवा संसर्गासंदर्भातील माहिती भरणे आवश्यक आहे. याचबरोबर आरोग्यासंदर्भात आधीपासून असणाऱ्या समस्यांचीही माहिती या पेजवर द्यावी लागणार आहे.
-
पुढील पेजवर नाव आणि फोन क्रमांक देणे बंधनकारक आहे. या पेजवर देण्यात येणारी माहिती आणि तपशील केवळ शासनाकडे गोपनीय राहणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
-
नाव आणि फोन क्रमांक दिल्यानंतर युझर्सने दिलेल्या माहितीनुसार स्वचाचणीचा निकाल सांगितला जातो. हा वरील स्क्रीनशॉर्ट लक्षणं नसणाऱ्या व्यक्तीने केलेल्या स्वचाचणीचा आहे.
-
तसेच या पेजवर करोनासंदर्भात कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दची माहिती देण्यात आली आहे.
-
या पेजवर काय काळजी घ्यावे हे Does म्हणजेच हे करा या यादीमध्ये दिलं आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी