-
करोना व्हायरसमुळे पाच महिन्यांपूर्वी भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि अनेकजण आपल्या घरातच अडकले. करोना संकट अद्यापही टळलं नसल्याने लॉकडाउन नेमका संपणार कधी याचे फक्त अंदाज व्यक्त केले जात आहे. लॉकडानच्या या काळात लोकांमध्ये कमालीचा तणाव वाढत आहे. (Photo by Partha Paul)
-
एका अभ्यासानुसार, ४३ टक्के भारतीय नैराश्याचा सामना करत आहे. GOQii या हेल्थकेअर प्लॅटफॉर्मकडून हा अभ्यास करण्यात आला आहे . (Photo: GettyImage)
-
लॉकडाउनचा सामना कशा पद्दतीने केला जात आहे हे समजून घेण्यासाठी १० हजार भारतीयांना या अभ्यासात सहभागी करुन घेण्यात आलं होतं. (Photo: Pexels)
-
अभ्यासानुसार, २६ टक्के भारतीयांना सौम्य नैराश्य जाणवत असून ११ टक्के भारतीयांना माफक प्रमाणात हे नैराश्य जाणवत आहे. तर सहा टक्के भारतीयांना नैराश्याची लक्षणं जाणवत आहेत.
-
अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, “गेले पाच महिने अत्यंत अनपेक्षित होते. लॉकडाउनचा परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावरही झाला आहे. लॉकडाउन सतत वाढत असल्याने, भीती, नोकरीवर गदा, आरोग्याशी संबंधित भीती आणि अस्थिर वातावरण यामुळे तणावात कमालीचा वाढला आहे”.
-
“इतक्या प्रमाणात तणाव असल्याने नैराश्य निर्माण होत आहे. लॉकडाउन आणि जगण्याच्या पद्धतीत झालेला बदल यामुळे ४३ टक्के भारतीय सध्या नैराश्यग्रस्त असून या नव्या परिस्थिती आणि जगण्याच्या पद्धतीशी सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं अभ्यासातून समोर आलं आहे.
-
अभ्यास करताना सहभागी झालेल्यांना नऊ गोष्टींसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्यांची दैनंदिन दिनचर्या, भूक, झोपेची चक्रं, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि ऊर्जा पातळी यासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभ्यासानुसार, करोना व्हायरस आणि सततच्या लॉकडाउनमुळे देशभरातील नैराश्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. (Photo: GettyImage)
-
तणाव वाढत असल्यास योग्य डायट तसंच जीवनशैलीत बदल करत आणि योग्य झोप घेणं गरजेचं असल्याचं GOQii चे संस्थापक आणि सीईओ विशाल गोंडल यांनी सांगितलं आहे.
-
नैराश्य आल्याची तक्रार करणारे अनेकजण आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये काहीच आनंद मिळत नसल्याचं, कुचकामी वाटणं, झोप मिळत नसणे, खाण्यच्या वाईट सवयी, ऊर्जा कमी असणे, आत्मविश्वास कमी असणे, लक्ष केंद्रीत करण्यात त्रास होणे, अस्वस्थ आहे आणि स्वत: ला हानी पोहचवण्याचा विचार मनात येत असल्याचं सांगत आहेत.
-
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, “५९ टक्के भारतीयांना सध्याच्या दिवसात आपण जे करत आहोत त्यात हवा तितका आनंद मिळत नसल्याचं म्हणत आहेत. यामधील ३८ टक्के लोक काही दिवस अशी भावना येते सांगतात. तर ९ टक्के लोकांनी अनेकदा तर १२ टक्के लोकांनी दररोज अशी भावना येत असल्याचं सांगितलं आहे”.
-
अभ्यासात सहभागी ५७ टक्के लोकांनी आपल्याला सतत थकवा जाणवत असून अजिबात ऊर्जा असल्याचं वाटत नाही असं म्हटलं आहे. यामुळे अनेकांना वारंवार झोप येत असून काहींनी झोप येत नसल्याचं म्हटलं आहे. जीवनशैलीत बदल झाल्यानेही अनेकांनी झोपेची तक्रार नोंदवली आहे.
-
७ टक्के लोकांना दर दिवशी ही समस्या जाणवत असल्याचं सांगितलं असून ३३ टक्के लोकांना काही ठराविक दिवसांमध्ये झोपेची समस्या जाणवत असल्याचं म्हटलं आहे.
-
दुसरीकडे आपण कुचकामी असल्याची भावना फार कमी जणांमध्ये आहे. १० टक्के लोकांनी आपल्याला शक्यतो रोजच अत्यंत नैराश्य येत असल्याचं म्हटलं आहे. (Photo: GettyImage)
-
अभ्यासात तणाव दूर करण्यासाठी आपल्या दैनंदिनीत व्यायामाचा समावेश करणं फायदेशीर ठरु शकतं असं सांगितलं आहे.
-
याशिवाय आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टी जास्तीत जास्त करण्यावर भर द्यावा असंही सुचवलं आहे. (Express Photo)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या