-
नववर्षाच्या सुरुवातीला एकीकडे जवळपास सर्वच कार कंपन्या आपल्या वाहनांच्या किंमती वाढवत असताना फोर्ड इंडियाने मात्र आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या किंमतीत कपात करून ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे.
-
फोर्ड इंडियाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील जबरदस्त कार फोर्ड इकोस्पोर्ट आता स्वस्त झाली आहे.
-
कंपनीने फोर्ड इकोस्पोर्टच्या विविध व्हेरिअंट्सच्या किंमतीत घसघशीत कपात केली आहे.
-
फोर्ड इकोस्पोर्ट ही कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. गेल्या वर्षीच 'फोर्ड इंडिया'ने Ford EcoSport ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये आणली. इकोस्पोर्ट टाइटेनियम ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये बीएस-6 मानकांसह 1.5-लिटर, 3-सिलिंडर नॅचरली-ऐस्परेटेड पेट्रोल इंजिन आहे.
-
हे इंजिन 120bhp पॉवर आणि 149Nm टॉर्क निर्माण करतं. इंजिनसोबत 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
-
नवीन ऑटोमॅटिक इकॉस्पोर्टचा मायलेज 14.7 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
-
फोर्ड इकोस्पोर्ट टाइटेनियम ऑटोमॅटिकमध्ये क्रूज कंट्रोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हील लॉन्च असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत.
-
इकोस्पोर्टच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये FordPass स्मार्टफोन अॅप देखील मिळेल. याद्वारे इंजिन स्टार्ट/स्टॉप किंवा कार लॉक/अनलॉक करण्याची सुविधा मिळते.
-
फोर्ड इकोस्पोर्टवर कंपनी 3 वर्ष/1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे. कंपनीकडून या एसयूव्हीच्या टेस्ट राइडची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी करण्याआधी तुम्हाला टेस्ट राइड करण्याची इच्छा असेल तर कंपनीकडून तशी व्यवस्था तुमच्यासाठी केली जाईल.
-
39 हजार रुपयांपर्यंत घसघशीत कपात – फोर्ड इंडियाने ग्राहकांसाठी 2021 Ford EcoSport रेंज आणली आहे. याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. किंमतीत कपात झाल्यानंतर इकोस्पोर्ट पेट्रोल Ambiente MT व्हेरिअंटची किंमत 20 हजारांनी कमी झाली असून आता 7.99 लाख रुपये झालीये. पहिले या व्हेरिअंटची किंमत 8.19 लाख रुपये होती. पेट्रोलमध्ये सर्वाधिक 39 हजार रुपये कपात Titanium + AT व्हेरिअंटची झाली आहे. त्यामुळे 11.58 लाखांवरुन आता या व्हेरिअंटची किंमत 11.19 लाख रुपये झाली आहे. तर डिझेलमध्ये Trend MT व्हेरिअंट 35 हजार रुपयांनी स्वस्त झालंय, याची नवीन किंमत 9.14 लाख रुपये झाली आहे. तर, डिझेलमधील सर्वात महाग व्हेरिअंट Sports MT ची किंमतही 24 हजारांनी कमी झाली आहे. त्यामुळे या व्हेरिअंटची किंमत आता 11. 49 लाख रुपये झाली आहे. किंमतीत कपात होण्यापूर्वी या व्हेरिअंटसाठी 11.73 लाख रुपये मोजावे लागायचे. ( सर्व फोटो – https://www.india.ford.com/ )

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा