-
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात हवामान थंड असते. तसेच याच दिवसांत अनेक साथीचे रोगही पसरतात. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. पावसाळ्यात थंड आणि जड पदार्थाचे सेवन आणि वातावरणातला बदल यामुळे शरीरात वायू आणि कफाचा प्रकोप होतो आणि पावसाळ्यातले शारीरिक त्रास सुरू होतात. ते टाळायचे असतील तर आहाराला पाचक आणि उष्ण पदार्थांची जोड द्यायला हवी. त्यामुळे काही गोष्टी टाळणं आणि काही पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करून घेतला पाहिजे. त्यामुळे या ऋतूत होणारे अनेक त्रास कमी होतात. (फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गवती चहा – पावसाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा जरूर घालावा. सर्दी-खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी गवती चहा मदत करतो.
-
फळभाज्यांचा समावेश करावा – या ऋतूत फळभाज्या व शेंगभाज्या अवश्य खाव्यात. फळभाज्यांमध्ये दुधी, घोसाळी, दोडका, तोंडली, लाल भोपळा, पडवळ या भाज्या खाव्यात. तर गवार, फरसबी, चवळीच्या शेंगा जरूर वापराव्यात. या भाज्यांच्या आत पाणी जाऊ खराब होण्याची शक्यता कमी असते.
-
भाकरी – ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी शक्यतो भाकरीच खावी. ज्वारी, बाजरी, नाचणी अशी कोणतीही भाकरी चालू शकते.
-
रताळी – रताळी या दिवसांत चांगली मिळतात व या दिवसांत उपवासांचे निमित्तही असते. रताळ्यातही ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे तेही खावं.
-
जायफळ – या दिवसात गोड पदार्थ तयार करताना त्यात जायफळ जरूर घालावे. जायफळ अन्नपचनासाठी मदत करते. मसालेभात किंवा मसालेदार भाज्यांमध्ये थोडीशी जायफळाची पूड घातली तर हे पदार्थही खूप जड होणार नाहीत.
-
पचायला हलेक पदार्थ – जेवणात सूप/ डाळीचे कढण/ भाताची पेज/ कोकम सार/ ताकाची कढी असे पातळ व गरम पदार्थ नेहमी समाविष्ट करावेत.
-
मेथी दाणे – पावसाळ्यात आहारात शक्य तिथे मेथीचा वापर जरूर करावा. मेथीच्या दाण्यांना मोड आणून ठेवावेत आणि ही मोड आलेली मेथी डाळी, उसळींसारख्या पदार्थामध्ये शिजताना १-२ चमचे घालावी. ही मेथी पदार्थात घातल्याने पदार्थ कडू लागत नाही. मेथीमुळे पोटात वायू धरणे कमी होते, तसेच वातामुळे होणारी अंगदुखी टाळण्यासाठीही मदत होते.
-
पालेभाज्या कमी खाव्या – पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमी करावा. पालेभाज्या पचवण्यास आपल्या आतड्यांना अधिक काम करावे लागते व पावसाळ्यात सर्वसाधारणत: पचनशक्ती थोडी कमी झालेली असते त्यामुळे आहारात तूर्त पालेभाज्या टाळाव्यात.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'लोकसत्ता ऑनलाइन'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”