-
आज २१ जून म्हणजेच जागतिक योग दिवस.
-
२०१५ पासून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
-
शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे.
-
बऱ्याच दिवसांनी आज पावसाने दडी मारल्याने नवी मुंबईतल्या नागरिकांनी पहाटेच्या प्रहरी योगासनं करण्याचा आनंद लुटला.
-
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या नागरिकांनी केलेल्या योगाभ्यासाची छायाचित्रे घेतली आहेत अमित चक्रवर्ती यांनी.
-
उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि संयम असणे आवश्यक असते.
-
पुण्यातल्या सहकारनगर भागातल्या नागरिकांनीही आजच्या योग दिनानिमित्त धुमे हॉल इथं एकत्र जमून योगाभ्यास केला.
-
हे फोटो घेतले आहेत पवन खेंगरे यांनी.
-
योग करण्याचे अनेक फायदे असून त्यामुळे अनेक शारीरिक व्याधीही दूर होतात.
-
कोणतेही योगासन करण्यापूर्वी योगाभ्यासकांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच योगप्रकार करावा.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग