-
फोडणीचा ब्रेड अथवा उपमा आपण दोन्ही खाल्लं आहे. पण तुम्ही कधी ब्रेड उपमा बनवला आहे का? नुसता ब्रेड खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी ब्रेड उपमा पण ट्राय करु शकता. हा नाश्ता झटपट बनतो. (फोटो: jansatta)
-
सकाळी अथवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मटर चाटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. तेसुद्धा अशावेळी जेव्हा तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. पटापट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. हे चाट सगळयांनाच आवडतं. (फोटो: jansatta)
-
मिक्स व्हेज पराठ्यामध्ये सर्व भाज्यांचे पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच मिक्स व्हेज पराठा हे आरोग्यदायी तसेच चविष्ट आहे. तसेच हा पराठा तुम्ही पटकन तयार करू शकता. (फोटो: indian express)
-
बेसनाचा पोळा ही सर्वात सोपी आणि सकाळी व्यवस्थित पोट भरणारी अशी झटपट नाश्ता रेसिपी आहे. बेसनचा पोळा अर्थात चिला आपण नेहमीच घरी करतो. (फोटो: indian express)
-
रवा डोसा घरात बनवणं तसं तर अगदीच सोपं आहे. रवा भिजवून ठेवायचा असं तुम्हाला वाटत असेल तर तसं करायची गरज नाही. तुम्ही अगदी दहा मिनिट्समध्ये रवा डोसा करू शकाता. (फोटो: indian express)
-
व्हेज मेयो सँडविच या सँडविचसाठी आपण बरेच पैसे मोजतो. पण हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि नाश्त्याला खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही. याची रेसिपीदेखील क्विक आहे. (फोटो: jansatta)
-
सकाळी तसं तर थोडं तेलकट खाणं टाळायलाच हवं पण जर शॅलो फ्राय असलेले चविष्ट व्हेज कटलेट असेल तर मग त्याची गरज भासत नाही. तुम्ही सकाळी पटकन हे बनवू शकता. (फोटो: jansatta)
-
आलू पोहे ही एक जलद आणि सोपी नाश्ता रेसिपी आहे. ही एक उत्तर भारतीय रेसिपी आहे जी मुलांना खूप आवडते. ही लाइट डिश एक उत्तम स्नॅक रेसिपी असू शकते आणि एक कप चहा किंवा कॉफी बरोबर दिली जाऊ शकते. (फोटो: financial express)
-
बऱ्याचदा घरी शिळी पोळी उरल्यावर सकाळच्या नाश्त्याला चहाबरोबर पोळी खावी लागते. मग नुसती पोळी खाण्यापेक्षा आपण मसाला पोळी करून खाऊ शकतो.(फोटो: file photo)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक