-
जर तुम्ही दिवसभर कामात खूप व्यस्त असाल, तर अशी वेळ नक्कीच येईल की तुम्हाला आळशी वाटू लागेल आणि पुढचे काम करावेसे वाटणार नाही. यावेळी तुमची सर्व ऊर्जा संपलेली असेल.
-
अशा वेळी पॉवर नॅप्स घेतल्याने तुम्हाला खूप मदत होऊ शकते. पॉवर नॅप म्हणजे थोडा वेळ झोप घेणे.
-
थोडा वेळ डुलकी घेतली तर सगळा आळस नाहीसा होतो आणि ती ऊर्जा पुन्हा कामाला येते.
-
कामात व्यस्त असणाऱ्या लोकांनी आपल्या दिनचर्येत ‘पॉवर नॅप’चा आवर्जून समावेश करावा. जेणेकरून दिवसभर काम केल्याने त्यांना थकवा येणार नाही आणि आराम मिळेल.
-
पॉवर नॅप जास्त वेळ घेऊ नये, नाहीतर जास्त झोप येऊ शकते आणि कामही राहू शकते. म्हणून, डुलकी घेण्याची योग्य वेळ १० ते ३० मिनिटे आहे.
-
ही छोटीशी डुलकी घेतल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया.
-
मूड चांगला राहील आणि कामात मन लागेल.
-
कामाबद्दल जागरुक राहण्यास मदत होईल.
-
प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देता येईल आणि आळशीपणा संपेल.
-
तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येतील आणि तुम्हाला स्मरणशक्तीमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा दिसेल.
-
कामात लक्ष वाढेल आणि एकाग्रताही साधता येईल.
-
पॉवर नॅप घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
-
झोपेतून जाग येण्यासाठी, २० मिनिटांनंतरचा अलार्म सेट करा.
-
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वातावरणात झोपणे, जिथे झोपल्यावर लगेच झोप येते. अन्यथा काही लोकांना झोप येण्यासाठीच बराच वेळ लागू शकतो.
-
सर्व फोटो : Pexels

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”