-
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना-PMMVY’ आहे.
-
या अंतर्गत नवजात बालकाच्या आईला ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सरकारने सुरू केली होती.
-
‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने’ अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
-
ही योजना ‘प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना’ म्हणूनही ओळखली जाते.
-
या योजनेचा उद्देश आई आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना पोषक आहार देणे हा आहे.
-
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथमच गरोदर असलेल्या महिलेची नोंदणी करण्यासाठी गरोदर व तिच्या पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटो स्टेटस असणे आवश्यक आहे.
-
बँक खाते संयुक्त नसावे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना ५००० रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल.
-
या योजनेचा उद्देश प्रथमच मातांना पोषण देणे हा आहे. ५००० रुपयांपैकी पहिला हप्ता १००० रुपये, दुसरा हप्ता २००० रुपये आणि तिसरा हप्ता २००० रुपये आहे.
-
सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही रक्कम सरकारकडून थेट महिलेच्या खात्यात जमा केली जाते.
-
तुम्ही ASHA किंवा ANM द्वारे PM मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.
-
योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जातो. त्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यात झाली की खाजगी रुग्णालयात.
-
मातृ वंदना योजना फक्त पहिल्या अपत्यापुरतीच असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
-
एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. (All Photos : Freepik)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक