-
आजकालच्या धकाधकीच्या काळात स्वयंपाक पटकन करण्यासाठी अनेक आधुनिक साधनसामुग्रीची मदत होते.
-
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी फ्रीज तर एक वरदानच आहे.
-
कारण फ्रीजमध्ये अन्नपदार्थांसोबतच फळं, भाज्या, दूध असे अनेक नाशिवंत पदार्थ बरेच दिवस टिकवून ठेवता येतात.
-
पण फ्रीजमध्ये काही फळं आणि भाज्या ठेवू नयेत.
-
या भाज्या फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास तुमची तब्बेत बिघडू शकते.
-
लसूण किंवा लसणाच्या पाकळ्या कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला पोषक वातावरण मिळते. यापासून ते बीज स्वरूपात अंकुरित होतं.
-
काकड्याही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. जर काकडी १० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात ठेवली तर तिचा वरचा थर वेगाने सडू लागतो. त्यामुळे इतर भाज्यांनाही हानी पोहोचू शकते.
-
बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते. बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. असा बटाटा मधुमेहाच्या रुग्णाला खाऊ घातल्यास साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.
-
कांदाही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे कांद्याची कडक होण्याची क्षमता मऊ होते. त्यामुळे कांद्यामधून नैसर्गिक घटक संपुष्टात येऊ लागतात. कांदे नेहमी कडक सूर्यप्रकाशापासून आणि अतिशय थंड हवामानापासून दूर ठेवा. (All Photos: Freepik)

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त दणका; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाडली पाकिस्तानी लष्कराची ६ विमाने