-
वाढते वजन व्यक्तीला नैराश्यात घेऊन जाते. एकदा वाढलेले वजन कमी करण्यासाठी कितीतरी मेहनत घ्यावी लागते.
-
सणांचे दिवस सुरू झाले आहे. या दिवसांमध्ये मिठाई, बाहेरचे पदार्थ, जंक फूड यांसारख्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि वजन वाढते.
-
चरबीयुक्त पदार्थ, जंक फूड आणि साखरेचे जास्त सेवन हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते.
-
जे लोक जास्त प्रमाणात अन्न खातात, त्यांचे वजन खूप वेगाने वाढू लागते.
-
विशेषत: सणासुदीला मिठाईपासून जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा.
-
जेवणानंतर गरम किंवा कोमट पाणी प्या.
-
अँटिऑक्सिडंट घटकांसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या.
-
वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर कॅलरी युक्त पेयांपासून दूर राहा.
-
पॅक केलेले ज्यूस, सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादीपासून दूर राहा. हे पेय तुम्हाला नको असलेल्या कॅलरीज देतात, ज्यामुळे वजन वाढते.
-
वर्कआउट करून तुम्ही तुमच्या शरीराला परफेक्ट शेप देऊ शकता.
-
वर्कआउट हा एकमेव उपाय आहे जो तुम्हाला तुमचे वजन संतुलित करण्यात मदत करू शकतो.
-
तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. (फोटो सौजन्य : pixabay)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल