-
भाज्यांचे सूप : भाज्यांचे सूप आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिवाळ्यात भाज्यांनी बनवलेले सूप प्यायल्याने शरीर उबदार राहते. सूप आजारांपासून बचाव करू शकते. भाज्यांचे सूप बनवताना त्यात काळी मिरी, दालचिनी आणि मीठ टाकले पाहिजे. (source – pixabay)
-
भाज्यांचे सूप बनवताना त्यात काळी मिरी, दालचिनी आणि मीठ टाकले पाहिजे. (source – प्रतिकात्मक)
-
गरम पेय : हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी तुम्ही गरम पेय पिऊ शकता. आल्याचा चहा प्यायल्याने देखील शरीरात स्फुर्ती येते. (source – freepik ) (source – )
-
तुळशी, आले आणि काळी मिरी सारख्या पदार्थांनी युक्त पेयांचे सेवन करता येऊ शकते. तुम्ही ड्रायफ्रुटयुक्त दुधाचेही सेवन करू शकता. (source – )
-
लाडू : गुळाचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. उडीद आणि मूग गुळात मिसळून तुम्ही लाडू बनवू शकता. गुळ आणि तूप मिसळून तुम्ही सुक्या मेव्याचे लाडू बनवून त्याचे सेवन करू शकता. (source – pixabay)
-
आले : हिवाळ्यात सर्दी खोकला सारखे आजार होता. हिवाळ्यात आल्याचे सेवन करावे. आले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. (source – संग्रहित)
-
सुका मेवा : सुका मेव्याने शरीराला प्रथिने, जीवनसत्व, खनिजे आणि फायबर मिळते. सुका मेवा मुळातच गरम असतो. त्यापासून मुबलक प्रमाणात उर्जा मिळते. तुम्ही हिवाळ्यात ड्रायफ्रुटचे सेवन करू शकता. (source – freepik)
-
तूप : हिवाळ्यात तुपाचे सेवन केले पाहिजे. तुपाने शरीर उबदार राहते. चपाती, भाजी आणि नाश्त्यामध्ये तूप टाकून खाल्ल्याने अशक्तपणा दूर होऊ शकतो. (source – )
-
मांसाहारी आहार : हिवाळ्यात मांसाहारी आहार फायदेशीर ठरू शकतो. मांसाहारी आहारातून प्रथिने आणि खनिजे मिळतात. मांसाहारी अन्न खाल्ल्याने शरीर बळकट होते. शाकाहारी असल्यास सोया, सुका मेवा आणि भाजीपाल्यांचे सेवन तुम्ही करू शकता. (source – संग्रहित)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली