-
हिवाळा सुरू झाला की लहान मुलांना सर्दी, खोकला असे अनेक आजार होतात. हवामानातील बदल, वाढते प्रदूषण, हिवाळ्यात पडणारे धुके यांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.
-
त्यातच लहान मुलांना या वातावरणात सतत सर्दी होते. या सतत होणाऱ्या सर्दीमुळे लहान मुलांसह त्यांचे पालकही त्रस्त असतात.
-
अशावेळी लहान मुलं सारखी औषधं खाण्यासही कंटाळतात, त्यामुळे यापासून सुटका कशी मिळवायची हा प्रश्न पडतो. यावर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
-
हळदीचे दूध : हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, त्यामुळे सर्दी खोकला अशा वायरल इन्फेक्शन स्वर हळद गुणकारी औषध मानले जाते. हिवाळ्यात मुलांना जर सर्दीचा सतत त्रास होत असेल तर त्यांना रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद टाकून देऊ शकता.
-
हळद घशातील खवखव आणि सर्दीपासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरेल, तर दुधातील कॅल्शियममुळे मुलांची हाडे मजबुत होण्यास मदत होईल.
-
शरीराला हायड्रेटेड ठेवणे : मुलांना सर्दी, खोकला असे व्हायरल इन्फेकशन होऊ नयेत यासाठी त्यांना हायड्रेटेड ठेवणे म्हणजेच त्यांच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य असणे आवश्यक असते.
-
पाण्यासह घशातील खोकल्याचे इन्फेकशन नष्ट होण्यास मदत होते. घशात होणारी खवखव, तसेच सर्दीचा त्रास यामुळे लहान मुलं पाणी पिण्याचा कंटाळा करतात. अशात पालकांनी मुलं योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करत आहेत ना याची काळजी घ्यावी.
-
मध: घशात होणारी खवखव, यामुळे घसा दुखणे यांवर मध हे गुणकारी औषध मानले जाते.
-
जर मुलांना हिवाळ्यातील बदलत्या वातावरणामुळे सतत घशात खवखव होत असेल तर त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा मध द्यावे. जर मुलांचे वय ५ वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यात दालचिनी पावडर देखील टाकता येईल.
-
गरम पाण्याची वाफ घेणे : सर्दीमध्ये लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. यासाठी त्यांना गरम पाण्याची वाफ द्या. वाफ घेतल्याने सर्दीमुळे बंद वाटणाऱ्या नाकपुड्या उघडण्यास मदत होईल आणि श्वास घेताना येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळेल.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : Freepik)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल