-
असे तर सर्व फळे वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. परंतु अंजीर हे एक असे फळ आहे ज्यात झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
-
अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असणाऱ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. खास करून टाईप २ मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अंजीरचे सेवन करणे अतिशय फायदेशीर असते.
-
अंजीरचे सेवन केल्याने मधुमेह असणारे रुग्ण रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करू शकतात. अंजीर खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून देखील आराम मिळू शकतो. फायबरने समृद्ध अंजीर पचन व्यवस्थित ठेवते, तसेच बद्धकोष्ठता दूर करते.
-
अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील जास्त असल्याने त्यांच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. आपण दररोज दुधासोबत अंजीरचे सेवन करू शकतो. तसेच, याच्या सेवनाने दात आणि स्नायू देखील मजबूत होतात. गुढग्याच्या दुखण्यावर हे प्रभावी आहे, सोबतच अंगातील सूज कमी करण्यास देखील गुणकारी आहे.
-
हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यासारख्या आजारांनी हैराण असाल तर अंजीरचे सेवन करा. याने खोकला, घसादुखी आणि ताप यांसारख्या समस्या दूर होतात. ५ अंजीर पाण्यात उकळून हे पाणी गाळून सकाळ-संध्याकाळ गरम-गरम प्यायल्याने थंडीत फायदा होऊ शकतो.
-
कमी पोटॅशियम आणि अधिक सोडियममुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अंजीरात पोटॅशियम जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने हे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यात प्रभावशाली आहे.
-
अंजीर दुधात उकळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. भिजवलेल्या अंजीराचे दूध प्यायल्याने आणि अंजीर चावून खाल्ल्याने काही दिवसातच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल.
-
दम्याच्या रुग्णांनी अंजीराचे सेवन केल्यास कफपासून आराम मिळतो. अंजीर कफ सहज काढून टाकते. २ ते ४ सुके अंजीर दुधात गरम करून सकाळ संध्याकाळ घेतल्याने कफ कमी होतो.
-
ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे त्यांनी अंजिराचे सेवन करावे. ३-४ सुके अंजीर संध्याकाळी पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मूळव्याध निघून जातो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
सर्व फोटो: Freepik

“आम्ही मारवाडी आहोत, मराठीत का बोलू?”, पुणेरी ग्राहकानं दुकानदाराला दाखवला मराठी हिसका, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?