-
Gajlaxmi Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा देव मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह लाभदायक स्थानी असतो त्यांचे भाग्य उजळण्याची ही वेळ असते अशी मान्यता आहे.
-
२०२३ या वर्षात गुरु ग्रह मीन राशीतुन मेष राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांना या राजयोगाने प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
-
मेष (Aries Zodiac)- गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींना आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या राशीत गुरु लग्नभावात स्थिर होणार आहे. हे स्थान संतती प्राप्तीचे तसेच व्यवसाय वृद्धीचे मानले जाते.
-
येत्या काळात गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींना नवीन नोकरीच्या संधी व प्रचंड पगारवाढ मिळू शकते. कोर्टाच्या खटल्यांमध्येही आपल्याला हवे तसे यश मिळू शकते.
-
धनु (Dhanu Zodiac) – गजलक्ष्मी राजयोगाने धनु राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. गुरु ग्रह हा आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. येत्या काळात धनु राशीच्या मंडळींना परदेशवारीचे योग आहेत.
-
येत्या काळात आपल्याला मित्रांच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे नातेसंबंध सुधारण्यास येणारा काळ हा अत्यंत शुभ ठरू शकतो.
-
मिथुन (Mithun Zodiac)- गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मिथुन राशीच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. आपल्या जुन्या गुंतवणूकीचा सुद्धा लाभ होऊ शकतो.
-
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर येत्या काळात तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतो, पण पूर्ण खबरदारी घ्या.
-
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा