-
शांत झोप न लागणं ही सध्या सामान्यतः सर्वत्र आढळली जाणारी समस्या आहे.
-
नेहमी झोपायला जाताना काही चांगल्या सवयी पाळल्यास झोप चांगली लागू शकते.
-
झोपेचे वेळापत्रक बनवून ते पाळल्यास चांगली झोप लागेल.
-
दिवसभर गॅझेटमुळे मन विचलित होते त्यामुळे एकाग्र झोपेसाठी किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप हाताळणे टाळावे.
-
मोबाईल आणि टीव्हीमधून येणारी किरणं झोप नियंत्रित करणाऱ्या मेलॅटोटिन हार्मोनची क्षमता कमी करतात
-
झोपण्याच्या खोलीत मंद प्रकाशाचा दिवा लावल्यास झोप छान लागेल.
-
रात्री उशिरा जेवणाच्या सवयीमुळे अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे शांत झोप लागण्यास अडथळा येऊ शकतो.
-
आम्ल गुणधर्मीय पदार्थांमुळे पचनसंस्था बिघडू शकते तेव्हा असे पदार्थ संध्याकाळी खाणे टाळा.
-
अंमली पदार्थांमुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचे संतुलन बिघडते त्यामुळे त्यांचे सेवन टाळा.
-
नियमित व्यायाम केल्यास शरीर आणि मन सुदृढ आणि ताजतवानं राहतं यामुळे जलद आणि चांगली झोप लागण्यास मदत होते.
-
मेंदूला ताण आला कि त्याचा परिणाम झोपेवर होतो म्हणून झोपण्यापूर्वी तणावपूर्वक गोष्टींचा विचार करणं टाळा.
-
रोज प्राणायाम केल्याने शरीस आणि मेंदू तणावमुक्त होऊन उत्तम आणि गाढ झोप लागेल.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

MI vs DC: मुंबई – दिल्ली सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्लेऑफमध्ये कोणाला एन्ट्री मिळणार?