-
फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात. त्यांचा आहारात समावेश केल्यास भरपूर फायदा होतो.
नैसर्गिक गोष्टींचा स्किनकेअरसाठी वापर केल्यास त्यातून फायदे होऊ शकतात. तसेच नैसर्गिक असल्याने त्याचा अपाय होण्याची शक्यता कमी असते. -
किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असून त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात.
-
केळीची साल ही एक्सफॉलीएंट सारखं काम करते. केळीच्या सालीने जखम भरू शकते.
-
डाळिंबाच्या सालीने चेहऱ्यावर मालिश केल्यास चेहऱ्यातील कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात. डाळिंबाची साल त्वचेच्या अँटी एजिंगवर काम करते.
-
संत्र हे व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचे उत्तम स्रोत असून त्यातील अँटी बॅक्टरीअल आणि अँटी मायक्रोबायल गुणांमुळे मुरमे आणि तेलकट त्वचेपासून सुटका मिळू शकते.
-
अॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि अमिनो अॅसिड असून त्याचा कोरड्या आणि रुक्ष त्वचेला फायदा होऊ शकतो.
-
टोमॅटोच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स असून त्यामुळे चेहऱ्याचे तारुण्य वाढवता येते तसेच त्वचेचा रंग ही उजळू शकतो.
-
गाजराच्या सालीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्याने रंग उजळून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

India Pakistan War Live Updates : माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु! पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारताचा ‘करारा जवाब’