-
यकृत हा आपल्या शरीराचा एक आवश्यक भाग असून अन्न पचवणे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हे याचे मुख्य काम आहे.
-
अशावेळी शरीराचा हा महत्त्वाचा भाग निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यकृताची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे आरोग्य बिघडू शकते. काहींना यकृताचा आजार अनुवांशिक असतो, तर काहींना खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यकृताचा आजार होतो.
-
व्हायरस, मद्यपान आणि लठ्ठपणा इत्यादी गोष्टी यकृताच्या आजारासाठी जबाबदार ठरू शकतात. यकृताच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास यकृताचा सिरोसिस होऊ शकतो, ज्यामुळे यकृत निकामी होऊ शकते.
-
यकृत निकामी होणे ही अतिशय जीवघेणी परिस्थिती आहे. यकृत निकामी झाल्याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आल्यास ही स्थिती घातक होण्यापासून वाचवता येऊ शकते.
-
वेबएमडीच्या बातमीनुसार, यकृतामध्ये समस्या असल्यास त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. लक्षणे वेळेवर ओळखता आली तर यकृत निकामी होण्यापासून टाळता येते. ही लक्षणे कशी ओळखायची ते जाणून घेऊया.
-
त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात
-
पोट दुखणे आणि सुजणे
-
पाय सुजणे आणि दुखणे
-
त्वचेला खाज येणे
-
लघवीचा रंग गडद होणे
-
विष्ठेचा रंग पिवळसर दिसणे
-
थकवा जाणवणे
-
मळमळणे किंवा उलटी होणे
-
भूक न लागणे
-
असे सुधारा यकृताचे आरोग्य
-
जास्त प्रमाणात मद्यपान करणे टाळावे. मर्यादित प्रमाणात मद्यपान केल्यास यकृताचे नुकसान टाळता येते.
-
यकृताचे आजार टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ओटीपोटात चरबी जमा होणे आणि जास्त वजन यकृत रोगाचा धोका वाढवते. यकृत निरोगी ठेवण्यासाठी, कॅलरी, चरबी आणि शुद्ध कर्बोदके जसे की तेल, तूप, चीज आणि साखरयुक्त पेये टाळा.
-
फळे, भाज्या आणि उच्च फायबरयुक्त पदार्थांनी युक्त संतुलित आहार घ्या.
-
यकृताचा संसर्ग रोखण्यासाठी हिपॅटायटीस बी लसीकरण खूप यशस्वी आहे. यकृताचे रक्षण करण्यासाठी तुम्ही हिपॅटायटीस ए लस घेऊ शकता.
-
यकृताचे नुकसान टाळण्यासाठी, स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे जसे की शौचालय वापरण्यापूर्वी, खाण्यापूर्वी आणि अन्न तयार करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा. याव्यतिरिक्त, वैयक्तिक वस्तू जसे की रेझर, टूथब्रश आणि सुया इतरांबरोबर वापरणे टाळा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीरात वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Photos: Freepik)
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका