-
हिंदू धर्मांत अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. यालाच मलमास, पुरूषोत्तम मास किंवा ग्रामीण भागात धोंड्याचा महिनाही म्हटले जाते.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा तब्बल १९ वर्षांनंतर श्रावण महिन्यात अधिक मासाचा दुर्मिळ योग आलेला आहे.
-
श्रावण महिना हा शिवशंकराच्या भक्तांसाठी खास मानला जात असून यंदा श्रावण मास हा ५९ दिवसांचा असून यादरम्यान ८ श्रावणी सोमवार येतील.
-
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, यंदाचा श्रावण महिना हा महादेवाच्या कृपेने ५ राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरु शकतो. पाहूया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी..
-
श्रावण वृषभ राशीतील मंडळीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता असून वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो.
-
विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
-
मिथुन राशीला यंदा शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली असल्याने श्रावणात त्यांना शंकराची कृपा दुप्पटीने लाभू शकते.
-
रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. तसेच नोकरीच्या नव्या संधीही याकाळात उपलब्ध होऊ शकतात.
-
सिंह राशीसाठी श्रावण महिना चांगला ठरू शकतो. कार्यक्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
-
या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
या राशींच्या लोकांवर भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
-
मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही कोणतेही पद देखील मिळवू शकता.
-
श्रावण महिना धनु राशीतील मंडळीसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
-
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल