-
आपल्यापैकी अनेकजणांना तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवतो. पण या त्रासासाठी आपण ताण किंवा इतर अनुवांशिक गोष्टींना कारणीभूत मानतो.
-
मात्र, काही लोकांना असे आढळून आले आहे की विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांची डोकेदुखी लक्षणीयरीत्या वाढते.
-
मायग्रेन होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे मद्य, विशेषतः रेड वाइन.
-
डोकेदुखी आणि मायग्रेनशी जोडलेला आणखी एक पदार्थ म्हणजे टायरामाइन. टायरामाइन हे एक संयुग आहे जे जुन्या चीजमध्ये आढळते. चीजमधील टायरामाइनचे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
-
चॉकलेटमध्ये आढळणारे कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन काही विशिष्ट लोकांमध्ये डोकेदुखीचे कारण बनतात.
-
किमची सारखे लोणच आणि आंबलेल्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात टायरामाइन असू शकते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
-
स्ट्राँग कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने मायग्रेन किंवा डोकेदुखी होऊ शकते.
-
संत्री, मोसंबी, लिंबू आणि द्राक्ष यांसारख्या आंबट फळांमध्ये ऑक्टोमाइन नावाचे रसायन असते ज्यामुळे डोकेदुखी होते.
-
तुम्ही जर लैक्टोज असहिष्णु असाल, तर दूध प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.
-
काही लोकांना आइसक्रीमसारखे थंड पदार्थ खाल्ल्याने तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
सर्व फोटो : Pexels

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा