-
मॅगी बनवायला सर्वात जलद आणि सोपी आहे, विशेषतः जेव्हा तुम्हाला काहीतरी झटपट हवे असेल तेव्हा हा पर्याय निवडा.
-
पण या आवडत्या इन्स्टंट नूडलची चव वाढते की त्यासोबत येणाऱ्या पॅक केलेल्या स्वादिष्ट मसाल्यामुळे.
-
पण हा मॅही मसाला तुम्ही घरी बनवू शकता, घरी बनवलेल्या मसाल्यांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह नसतात. जाणून घ्या रेसिपी,
-
ही रेसिपी अशा मातांसाठी देखील योग्य आहे ज्यांना त्यांच्या बाळांना रासायनयुक्त पदार्थ खायला द्यायचे नाही.
-
साहित्य
४ चमचे – मीठ,
१ चमचा – साखर -
२ चमचे – भाजलेले धने-जिरे पावडर
-
अर्धा टीस्पून – लाल मिर्च पावडर
पाऊण टीस्पून – हळद पावडर -
अर्धा टीस्पून – आमचूर पावडर
पाव टीस्पून – मेथी पावडर (मेथी पावडर)
२ चिमूटभर – जायफळ पावडर
पाऊण टीस्पून – सुंठ पावडर
पाऊण टीस्पून – काळी मिरी पावडर
पाऊण चमचे – सायट्रिक ऍसिड -
१ आणि अर्धा टीस्पून – कांदा पावडर
१टीस्पून + पाऊण टीस्पून – लसूण पावडर -
अर्धा टीस्पून – गरम मसाला आणि चिमूटभर बडीशेप पावडर (हे सर्व सुगंधी मसाले चांगले मिसळा)
-
एका वाडग्यात एक एक करून साहित्य घालून चांगले मिसळा. ते हवाबंद डब्यात साठवा. तुम्ही हा मसाला महिनाभर खाऊ शकता.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”