-
डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटल येथील मुख्य आहारतज्ज्ञ ऋचा आनंद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक महिना चहा सोडण्याचे फायदे सांगितले आहेत.
-
शरीरातील कॅफीनचे प्रमाण नियंत्रणात येऊन तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होऊ शकते.
-
कॅफिनमुळे हार्मोन्स सक्रिय होऊन चिंता सुद्धा वाढ शकते. चहा न घेतल्यास आपण चिंतामुक्त राहू शकता
-
चहामुळे लघवीला जाण्याचे प्रमाणवाढते यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ लागतं.
-
याचाच प्रभाव मग त्वचेवर सुद्धा पिंपलच्या रूपात दिसू लागतो. चहा टाळल्याने हे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात
-
चहा सोडल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात, ज्यामुळे पेशींना चालना मिळते. हे पाचन रोग आणि कर्करोगाच्या विशिष्ट प्रकारांना थांबवण्यास मदत करू शकते.
-
काही लोकांसाठी चहाचे सेवन हा सवयीचा भाग झालेला असतो. यामुळे एका प्रकारची तरतरी व ऊर्जा येते असेही अनेकजण म्हणतात
-
चहा बंद केल्याने ही ऊर्जा कमी झाल्याचा मानसिक आभास होऊ शकतो.
-
तुम्ही फायदे व तोटे दोन्ही लक्षात घेऊन चहासाठी उत्तम पर्याय शोधू शकता. ग्रीन टी आवडत नसल्यास, पेपरमिंट टी, अपराजितांच्या फुलांचा ब्लु टी असे पर्याय उत्तम काम करतात.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल