-
कुटुंब ही एक अशी पद्धत आहे, जिथे एकत्रित राहून अनेक नाती जपली जातात. एकत्र कुटुंब पद्धतीत एकाच छताखाली सर्व प्रेमाने राहतात, यालाच इंग्रजीमध्ये जॉइंट फॅमिली म्हणतात. (Photo : Freepik)
-
जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना एकटा करावा लागत नाही. (Photo : Freepik)
-
एकटं राहण्याच्या नादात अनेकदा लोकं जबाबदारीचा विचार करत नाही, पण जॉइंट फॅमिलीमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाते; ज्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचा भार येत नाही आणि व्यक्ती तणावमुक्त राहतो. (Photo : Freepik)
-
अनेक लोकांना असे वाटते की, जॉइंट फॅमिलीमध्ये राहिल्यामुळे खर्च वाढतो, पण खरं पाहायचं तर जॉइंट फॅमिलीचा खर्च एकटं राहणाऱ्या कुटुंबापेक्षा कमी असतो. (Photo : Freepik)


सध्याच्या धावपळीच्या जगात जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्यासाठी अनेक लोक टाळाटाळ करतात, पण तुम्हाला जॉइंट फॅमिलीचे फायदे माहिती आहेत का? जर हे तगडे फायदे जाणून घ्याल, तर तुम्ही कधीही एकटे राहणार नाही. (Photo : Freepik)


