-
अनेकदा कंटाळवण्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लोणच्याची मदत घेतो.
-
तिखट चटपटीत लोणचे खाल्ल्याने जेवणाची रंगत वाढते. मात्र लोणचं खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
-
जेवणाची चव वाढवणारे लोणचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
-
आज आपण, लोणचे आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे मदत करते याबाबत जाणून घेऊया.
-
आंबवलेले लोणचे आतड्याला अनुकूल प्रोबायोटिक्स प्रदान करतात.
-
लोणच्यात कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजनाचे नियंत्रण करण्यास मदत होते.
-
अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध लोणचे मुक्त रॅडिकल्सशी लढा देते.
-
लोणच्यामध्ये क्षार असल्यामुळे ते इलेक्ट्रोलाइट्सची निर्मिती करण्यास मदत करते.
-
लोणच्यात असलेले व्हीनेगर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
-
तिखट चटपटीत लोणचे व्हिटॅमिन के आणि लोह यांसारखे महत्त्वाची पोषकतत्त्वे प्रदान करते.
-
जेवताना लोणचे खालल्यास पचन सुधारण्यास मदत होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल