-
प्रसूतीनंतर महिलांचे वजन वाढणे ही खूप सामान्य समस्या आहे. प्रसूती झाल्यानंतर पोट आणि कंबरेजवळची चरबी वाढते. (Photo : Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी महिला वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रसूतीनंतर वजन वाढणे चांगले आहे की वाईट? (Photo : Freepik)
-
याविषयी डॉ. दिप्ती जामी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. दिप्ती जामी सांगतात, “प्रसूतीनंतर वजन वाढणे खूप सामान्य गोष्ट आहे.” (Photo : Freepik)
-
“नऊ महिन्यांच्या गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात आणि वजन वाढते; पण प्रसूतीनंतर शरीर पुन्हा पूर्वीसारखे होऊ शकते.” (Photo : Freepik)
-
त्या पुढे सांगतात, “हार्मोनल बदल, स्तनपानादरम्यान वाढलेल्या कॅलरीज, कमी झोप इत्यादी काही गोष्टींमुळे प्रसूतीनंतर वजन वाढते. (Photo : Freepik)
-
“अति प्रमाणात वजन वाढणे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. (Photo : Freepik)
-
“त्यामुळे प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.” (Photo : Freepik)
-
अनेक महिला प्रसूतीनंतर वजन वाढले की टेन्शन घेतात. त्यांच्यासाठी डॉ. दिप्ती जामी यांनी दिलेली ही माहिती फायदेशीर ठरू शकते. (Photo : Freepik)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…