-
दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. (Photo : Freepik)
-
अनेकांना एका ठिकाणी तासन्-तास बसून काम करण्याची सवय आहे.त्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी होते ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. (Photo : Freepik)
-
चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे, धावणे, चालणे तितकेच गरजेचे आहे.अनेकदा डॉक्टर आपल्याला चालण्याचा सल्ला देतात. (Photo : Freepik)
-
खरंच चालण्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो का? आज आपण चालण्याचे फायदे जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चालण्याचे फायदे सांगितले आहे. (Photo : Freepik)
-
चालण्यामुळे वजन कमी होते. शरीराला आकार देण्यास मदत होते. (Photo : Freepik)
-
ह्रदय निरोगी ठेवण्यास मदत होते.मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते. (Photo : Freepik)
-
कॅन्सरचा धोका कमी होतो. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. (Photo : Freepik)
-
सांधेदुखीचा त्रास कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते.ऊर्जा वाढते आणि तुम्हाला प्रसन्न वाटतं. (Photo : Freepik)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”