-
भारतात राजमाचे उत्पादन आणि सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते.
-
मात्र, राजमा केवळ चवदारच नाहीत तर खूप आरोग्यदायीही आहेत.
-
राजमामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स, लोह आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात.
-
हिवाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.
-
राजमाचे सेवन केल्यास शरीराला बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स मिळतात, यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
-
राजमामधील अँटिऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतात. याचे सेवन केल्याने व्हायरल इन्फेक्शन कमी होऊ शकते.
-
राजमामध्ये भरपूर लोह असते. याचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही.
-
राजमामध्ये असलेले फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बचाव करण्यास मदत करते.
-
मॅग्नेशियम युक्त राजमाचे सेवन केल्याने आपली हाडेदेखील मजबूत होऊ शकतात.
-
यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. म्हणून मधुमेहींनी राजमाचे सेवन खूप फायदेशीर आहे.
-
इतकेच नाही तर राजमाचे सेवन केल्याने रक्तदाब सुधारते, हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि स्नायूही मजबूत होतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश