-
बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमा गरम वाफाळलेल्या चहाने करतात. आपण भारतीयांचा दिवस सकाळच्या चहाशिवाय सुरू होत नाही. (फोटो : Freepik)
-
हिवाळ्यात तर गरमा गरम चहा हवाच. पण तुम्हाला माहित आहे का की चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? (फोटो : Freepik)
-
अनेकदा आपण चहाचा आनंद घेतो पण तो पिण्याच्या योग्य पद्धतीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे चहापासून फायद्यांऐवजी तोटाच होऊ लागतो. (फोटो : Freepik)
-
चला जाणून घेऊया चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत…(फोटो : Freepik)
-
सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय अनेकांना असते. (फोटो : Freepik)
-
जेव्हा सकाळी आपण जागे होतो तेव्हा आपल्या शरीराची उर्जा पातळी कमी होते. अशा स्थितीत सकाळी उठल्यानंतर आपल्याला झटपट ऊर्जा देणारे काहीतरी प्यावे. (फोटो : Freepik)
-
चहा-कॉफीमुळे तुम्हाला थोडावेळ फ्रेश वाटेल पण त्या आपल्या शरीराला थकवा आणतात. (फोटो : Freepik)
-
म्हणून सकाळी उठल्यावर लिंबूपाणी, ग्रीन टी, फळे किंवा भाज्यांचा रस यांसारखी काही आरोग्यदायी पेये प्यावीत. हे आपले शरीर हायड्रेटेड ठेवेल आणि ऊर्जा देखील देईल. तसेच आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. (फोटो : Freepik)
-
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कधी चहा प्यावा? तर झोपेतून उठल्यानंतर १ ते २ तासांनी चहा प्यावा.(फोटो : Freepik)

‘हातातली मॅच घालवली’, पाकिस्तानकडून पराभव होताच बांगलादेशचा कर्णधार संतापला; म्हणाला, “या लोकांमुळे…”