-
वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनुसार, मकरसंक्रांतीच्या आधी ११ जानेवारी सूर्य उत्तराषाढ़ा नक्षत्रात प्रवेश करणार आहे तर शनी महाराज शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश घेणार आहेत. या दोघांच्या प्रभाव कक्षा या कालावधीत एकत्र येत असल्याने काही राशींना याचा प्रभाव जाणवून येणार आहे.
-
Shani Surya Gochar 2024: ११ जानेवारीला सूर्य देव व शनी महाराज एकत्रित नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. सूर्य व शनी हे पितापुत्र मानले जातात. त्यांचे एकत्र नक्षत्र परिवर्तन १०० वर्षांनी होणार आहे.
-
मेष (Mesh Zodiac) शनी व सूर्याच्या युतीने मेष राशीच्या मंडळींसाठी अनुकूल कालावधी सुरु होणार आहे. अडकून पडलेली कामे व योगायोगाने पैसे दोन्ही यातून परत मिळू शकतात. या कालावधीत मित्रांसह आनंदाचे काही क्षण अनुभवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊ शकते.
-
विद्यार्थी वर्गाला हा कालावधी लाभदायक असणार आहे. काम, शिक्षण किंवा मोठ्या कोणत्या कारणाने तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. शनी तुमच्या राशीच्या कुंडलीत ११ व्या स्थानी तर सूर्यदेव नवव्या स्थानी सक्रिय असणार आहे.
-
सिंह (Leo Zodiac) सिंह राशीसाठी सूर्य व शनीचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक सिद्ध होऊ शकते. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाट्याला येऊ शकतो पण फळ हे तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असेल.
-
या कालावधीत तुम्हाला यशाचे शिखर गाठता येणार आहे, तुमच्या शत्रूंकडे शक्य तितके दुर्लक्ष करा. पैसे गुंतवाल तसे वाढतात हा नियम लक्षात ठेवा.
-
कुटुंबासह चांगला वेळ घालवाल, जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. मित्रांची मदत तुमच्या मानसिक व आर्थिक बाजूला खूप मदतीची ठरू शकते.
-
तूळ (Tula Zodiac): तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचे राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकते. या कालावधीत तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”