-
Tulsi homemade facepack: घरोघरी सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळस या रोपाला धार्मिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचे समजले जाते.(Photo: Freepik)
-
कोणतीही पूजा, कार्य असू दे तुळस ही लागतेच. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, या तुळशीचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा उजळ आणि चमकदार ठेवू शकता.तिचा योग्य प्रकारे वापर केल्याने आपल्याला सौंदर्यही मिळते.(Photo: Freepik)
-
चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. तसेच ते आपली त्वचा चमकदार बनवते आणि सुरकुत्या आणि रेषा देखील दूर करू शकते. (Photo: Freepik)
-
चला तर मग आज याच तुळशीपासून बनवलेले चार घरगुती नैसर्गिक फेसपॅक पाहुयात. (Photo: Freepik)
-
तुम्ही तुळशीचा नैसर्गिक क्लिन्झर म्हणून वापर करू शकता. हा क्लींजिंग फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीची पावडर लागेल, तुम्ही तुळशीची पावडर घरी बनवू शकता. तुळशीची पावडर बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीची ताजी पाने लागतील आणि ती सुकण्यासाठी सुमारे पाच दिवस उघड्यावर ठेवावी लागतील. ती कोरडे झाली की त्यांची बारीक पावडर करून घ्यावी. मास्क बनवण्यासाठी एक चमचा वाळलेल्या तुळशीची पावडर आणि तितकेच दही घेऊन घट्ट पेस्ट बनवा. (Photo: Freepik)
-
तुम्ही तुळशी आणि कडुलिंबाच्या पानांचा वापर करून अँटी-एक्ने फेस मास्क बनवू शकता. तुम्हाला फक्त दोन लवंगांसह कडुलिंब आणि तुळशीची पाने लागणार आहेत. त्यातर त्यात थोडे पाणी घालून बारीक करून घट्ट पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट डोळ्याभोवतीचा भाग टाळून हे चेहऱ्यावर लावा.(Photo: Freepik)
-
जर तुम्हाला तुमची त्वचा उजळवायची असेल, तर तुम्ही हा तुळशीचा फेस मास्क नक्कीच वापरून पहा. हा मास्क बनवण्यासाठी एक चमचा तुळशीची पेस्ट आणि एक चमचा दूध मिसळा. (Photo: Freepik)
-
डागमुक्त त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही हा फेस मास्क वापरु शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावरील डाग कमी करेल. ही पेस्ट बनवण्यासाठी कडुलिंब आणि तुळशीच्या पाने घ्या त्यात थोडे पाणी घालून बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि मुरुमांवर लावा. (Photo: Freepik)
-
तुळशीचे हे वेगवेगळे फेसपॅक त्वचेच्या विविध समस्या सोडवतील.(Photo: Freepik)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी