-
एखाद्या व्यक्तीसाठी तिचा आहार जितका महत्त्वाचा असतो तितकीच झोपही महत्त्वाची आहे. निरोगी आरोग्यासाठी शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
-
अशा परिस्थितीत दररोज सात तासांपेक्षा जास्त आणि १० तासांपेक्षा कमी झोप घेणे आवश्यक आहे.
-
यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो, तसेच आपला थकवा निघून जातो. मात्र योग्य पद्धतीने झोपणेही गरजेचे आहे.
-
अनेक लोक रात्री झोपताना गडद अंधारात झोपणे पसंत करतात. तर काही लोकांना रात्री झोपताना प्रकाश असलेल्या खोलीत झोपणे आवडते. हा प्रत्येकाच्या सवयीचा भाग आहे.
-
मात्र रात्री झोपताना खोलीत प्रकाश असणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याचे अनेक दुष्परिणाम आहेत.
-
एका अभ्यासानुसार रात्री झोपताना मंद प्रकाशात झोपणे हे जेष्ठ नागरिकांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा आजारांशी संबंधित आहे.
-
शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन येथे करण्यात आलेल्या या अभ्यासात झोपेदरम्यान खोलीत असलेल्या प्रकाशाचा संबंध आरोग्याच्या जोखमींशी अधिक असल्याचे ठळकपणे दिसून आले.
-
ऑक्सफर्ड अकॅडमिक स्लीपमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये ६३-८४ वयोगटातील ५५२ जेष्ठ नागरिकांचे विश्लेषण केले गेले, ज्यांनी सीव्हीडी (हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित) जोखीम घटक प्रोफाइल, क्रियाकलाप आणि हलक्या उपायांसाठी ७ दिवसांच्या अॅक्टिग्राफी रेकॉर्डिंगची तपासणी केली.
-
मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये कार्यरत डॉ अनिकेत मुळे यांच्यानुसार प्रकाशाच्या संपर्कामुळे शरीराच्या अंतर्गत झोपेच्या घड्याळात बदल होतो. तसेच झोपेचे प्रमाण आणि गुणवत्तेवर याचा परिणाम होतो.
-
जेव्हा खोली पूर्णपणे अंधारलेली असते, तेव्हा शरीर मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करते जे स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगासह इतर अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.
-
खोली अंधारमय असल्यास तुम्हाला शांतपणे झोपणे देखील सोपे होते.
-
हे केवळ लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करत नाही तर नैराश्य देखील कमी करते. (All Photos : Pexels)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल