-
स्वयंपाक करताना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, आरोग्याच्या दृष्टीने देखील कढीपत्ता फायदेशीर ठरतो . त्यामुळे कढीपत्त्याचे सेवन करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कढीपत्त्याचे सेवन नेमकं करायचे तरी कसे. तर तुम्ही चहा बनवून कढीपत्त्याचे सेवन करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कढीपत्ता चहा कसा बनवायचा ? मूठभर कढीपत्ता पाण्यात उकळवा. नंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध आणि लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कढीपत्त्याचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. रोज सकाळी रिकाम्या पोटी काही ताजी कढीपत्त्याची पानं खाल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. कढीपत्त्यात असलेले फायबर पोट स्वच्छ आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. कढीपत्त्यामुळे शरीरातील उच्च रक्तातील कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि वजन वाढत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्