-
लांबसडक, सरळ आणि सुंदर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. काहींचे केस जन्मतःच सरळ असतात तर काहींचे नसतात.
-
आजच्या युगात प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. ज्यांना सरळ केस आवडतात ते स्ट्रेटनिंग करतात.
-
केस स्ट्रेट करण्यासाठी सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग. खरंतर हेअर स्ट्रेटनिंग ही एक अशी हेअर स्टाईलिंग टेक्निक आहे, ज्याच्या वापराने तुमच्या केसांना स्ट्रेट केलं जातं.
-
स्ट्रेटनिंगसाठी महिला पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. तर काही अधून-मधून घरीच केस स्ट्रेट करतात.
-
तज्ज्ञ आंचल पंथ यांच्या मते, नियमितपणे हीटिंग टूल वापरून आपले केस सरळ केल्याने ते कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात.
-
वारंवार केस स्ट्रेट केल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात आणि ते तुटू शकतात.
-
पंथ यांच्या म्हणण्यानुसार, केस स्ट्रेट करतानाही काही खबरदारी घ्यायला हवी. लक्षात ठेवा ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर वापरू नका. कारण केस ओले राहिल्यास जास्त नुकसान होऊ शकते.
-
तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा स्ट्रेटनरचा वापर करणे टाळावे.
-
जर तुम्हाला हे हीटिंग टूल आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा वापरायचे असेल तर, इतर पर्याय शोधा. हीट स्टाइलिंग उत्पादनांचा जास्त वापर केल्याने केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, याबाबतचे वृत्त वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. (फोटो सौजन्य : freepik)

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”