-
गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. (Photo: Freepik)
-
सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. आजाराचे निदान झाल्यावर सर्वात आधी मनात येणारा विचार म्हणजे, “आता जे कळलं ते आधी कळायला हवं होतं”. (Photo: Freepik)
-
हृदयविकाराच्या बाबत अशा काही गोष्टी आहेत ज्या मुळात हृदयविकाराचा झटका येण्याआधीच दिसून येऊ शकतात ज्यामुळे आपण परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणू शकता. (Photo: Freepik)
-
छातीत अस्वस्थता किंवा श्वासोच्छवास तीव्र झाल्यास तातडीनं डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे, कारण ही हृदयविकाराच्या झटक्याची पहिली लक्षणे असू शकतात. याशिवाय आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे हे पाहूया..(Photo: Freepik)
-
जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयविकार टाळायचे असतील तर तुम्हाला तुमचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवावे लागेल. (Photo: Freepik)
-
खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. रोज व्यायाम करावा लागेल आणि धूम्रपानापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. कमी तेलात घरी शिजवलेले अन्न खावे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल आणि कार्बोहायड्रेट्स कमी करता येतील. (Photo: Freepik)
-
हृदय धडधडणे – तुमचे हृदय खूप जोरात धडधडत किंवा खूप हळू धडधडणे, छातीत अस्वस्थता – तुम्हाला छातीच्या भागात अस्वस्थता, वेदना किंवा दाब जाणवू शकतो.(Photo: Freepik)
-
श्वासोच्छवासाचा त्रास – तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा श्वास सोडल्याचा अनुभव येऊ शकतो. चक्कर येणे किंवा डोके जड होणे – काही लोकांना चक्कर येते, जास्त थकवा किंवा उर्जेची कमतरता जाणवणे.(Photo: Freepik)
-
घाम येणे- अस्पष्ट घाम येणे, विशेषत: विश्रांतीच्या कालावधीत किंवा कमीतकमी श्रम करताना. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा तुमचे वय जास्त असल्यास नियमीत तपासणी करणे आवश्यक आहे. (Photo: Freepik)

साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की