-
एका आगामी चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने तब्बल ३६५ दिवस म्हणजेच १ वर्षभर साखर आहारातून वगळली होती. हा प्रयोग अत्यंत फायदेशीर ठरल्याचे कार्तिकने सांगितले होते.
-
एक प्रयोग म्हणून का होईना तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आहारातून साखर काढून टाकण्याच्या विचारात असाल तर आज आपण या प्रयोगाचे असे फायदे पाहणार आहोत ज्याने तुम्हाला खूपच प्रोत्साहन मिळू शकते
-
अहमदाबादच्या झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, साखर वर्ज्य केल्याने किंवा मर्यादित केल्याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात
-
साखर कमी केल्याने रक्तदाब कमी होऊन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
-
मर्यादित साखरेचा आहार दातांचे आरोग्य चांगले ठेवतो व कीड लागणे, पोकळी आणि हिरड्यांचे आजार सुद्धा कमी होतात. तसेच मुरुमे कमी होऊन त्वचा अधिक तरूण दिसू लागते.
-
साखरेवरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे मानसिक स्पष्टता आणि कामाच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येऊ शकते. भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, साखर टाळल्याने झोपेची गुणवत्ता वाढवते आणि एकूणच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
-
पण साखर कमी केली म्हणजे साखरेच्या जागी गूळ किंवा कृत्रिम स्वीटनर वापरणे असा अर्थ होत नाही. साखर आणि गूळ या दोन्हींमध्ये समान कॅलरीज असतात. त्यामुळे अगदी साखर, गूळ, मिठाई एनर्जी ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स सर्वकाही टाळणे आवश्यक आहे
-
सवय बदलताना थोडे अस्वस्थ वाटू शकते पण कालांतराने, तुमची उर्जा पातळी स्थिर होते आणि मूड स्विंग्स कमी होतात. तरीही निर्णय घेण्याआधी आपण आपल्या आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घेऊ शकता
-
भारद्वाज यांच्या माहितीनुसार, एक चमचा साखरेमध्ये 20 कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी सुद्धा या काढून टाकलेल्या कॅलरीज वरदान ठरू शकतात. तसेच साखर कमी केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास मदत होते आणि टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल