-
आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण सर्वच जण घड्याळ्याच्या काट्याभोवती धावत आहोत. यामुळे नेहमीच आपलं आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष होते. आणि सहाजीकच याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo: Freepik)
-
कधी ऑफिसचं टार्गेट, वेगवेगळे प्रेजेंटेशन्स आपल्याला झोपू देत नाही तर कधी आपण मोबाईलच्या अती आहारी गेल्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतो. (Photo: Freepik)
-
वेळेवर न झोपणे वेळवेर न उठणे, अर्धवट झोपेचा आपल्या शरिरावर घातक परिणाम होऊ शकतो. (Photo: Freepik)
-
आपण आतापर्यंत झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे बरेच दुष्परिणाम ऐकले असतील. मात्र एका संशोधनातून जी माहिती समोर आलीय ती वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (Photo: Freepik)
-
आजची तरुण पिढी प्रचंड मोबाईलच्या आहारी गेली आहे. मात्र तुम्ही असं करात असाल तर थांबा कारण एका संशोधनात असं समोर आलंय की फक्त एक रात्र न झोपल्याने तुमचा मेंदू दोन वर्षांनी म्हातारा होतो. (Photo: Freepik)
-
अर्धवट झोप तुम्हाला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जातो. शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागते. (Photo: Freepik)
-
झोप स्मरणशक्तीसाठीही मोठी भूमिका बजावते त्यामुळे झोप आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी तणामुक्त जीवनशैलीकरिता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. (Photo: Freepik)
-
सुंदर त्वचेपासून, पचनसंस्था, मानसिक आरोग्य, रक्तदाब असे बरेच आजार पुरेशी झोप घेतल्यामुळे दूर होतात. (Photo: Freepik)
-
दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित 7-8 तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. (Photo: Freepik)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…