-
उन्हाळ्यात घरात असलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आणि घर थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक रित्या ही अनेक पर्याय असतात.
-
जसे की नर्सरीमधील काही झाडे जी उत्तमरित्या घरातील उष्णता कमी करतात आणि घर थंड ठेवण्यास मदत करतात.
-
ही झाडे पर्यावरणपूरक असतात तर येत्या उन्हाळ्यात तुमचे घर थंड ठेवण्यासाठी काही उत्तम घरगुती पर्याय जाणून घेऊया.
-
कोरफड हे तुमच्या घरासाठी एक कूलिंग प्लांट असून हे घरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवते.
-
अरेका पाम या झाडाची पाने उंच असतात जी नैसर्गिक कूलर म्हणून काम करतात. पर्यावरणातील विषारी प्रदूषकांना काढून टाकतात आणि घरातील हवा शुद्ध करण्यास ही मदत करतात.
-
स्नेक प्लांट या झाडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे हवेत थंड ओलावा सोडते आणि उन्हाळ्याचे उष्ण तापमान कमी करण्यास मदत करते.
-
रबर चे झाड मोठ्या हिरव्या पानांसह असतं ज्यामुळे रूममधील उष्णता कमी होते आणि यामुळे हवेतील ओलावा वाढतो आणि रूममधील हवा थंड राहते.
-
चायनीज एव्हरग्रीनमध्ये उच्च वाष्पोत्सर्जन दर आहे ज्यामुळे ते तुमच्या रूमचे तापमान थंड राखण्यात हे मदत करते.
-
बांबूचे झाड हे त्याच्या पातळ, गडद हिरव्या पानांसह घरातील आर्द्रता शोषून घेतात आणि घरात स्वच्छ हवामान रखतं.
-
कॅलेथिया या झाडाला सुंदर हिरवी पाने असतात जी आर्द्रता शोषून घेतात आणि घरात घर थंड ठेवण्यास मदत करतात.
-
(सर्व फोटो: अनस्प्लॅश)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”